पुणे-सोलापुर हायवेवरून पुण्याच्या दिशेने निघालेले राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री दत्तात्रय (मामा)भरणे यांची गाडी निघाली असताना रावणगाव-मळद येथे ईनोवा गाडीच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी डीवायडर तोडून नामदार श्री भरणे मामा यांच्या लेनमध्ये येऊन समोर पडल्याचे पाहताच नामदार श्री भरणे मामा यांनी अपघातग्रस्त गाडीकडे तात्काळ धाव घेऊन गाडीतील माणसे उपस्थितांना खाली घेण्यास सांगितले तसेच त्यांना पाणि पिण्याची व्यवस्था करून सर्वांना मानसिक आधार दिला.सुदैवाने चालक बचावला असल्याचे पाहून त्याला थोडीफार ईजा झाल्याचे लक्षात येताच त्याला पुढील उपचारासाठी हाॅस्पिटलमध्ये पाठवण्याची व्यवस्था केली.
नामदार श्री दत्तात्रय ( मामा) भरणे यांनी पुणे येथे जाताना अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जात त्यांना कुटुंबातील सदस्यांप्रमाणे मानसिक व मायेचा आधार देऊन माणुसकीचे दर्शन घडवले याबद्दल अपघातग्रस्तांनी मंत्रिपदावर जाऊनही जमिनीवर पाय ठेवून सर्वसामान्य जनतेला तत्परतेने मदत करणारे मंत्रिमहोदय नामदार श्री भरणे मामा यांच्या रूपाने पाहिले असे नेतृत्व आजही असल्याने अपघातग्रस्तांबरोबरच उपस्थित सर्वांनी समाधान व्यक्त केले.