महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट क मधील पदांच्या भरतीसाठी अंशकालीन कर्मचाऱ्यांन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट क मधील पदांच्या भरतीसाठी अंशकालीन कर्मचाऱ्यांन
2021-01-07 16:03:12

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट क मधील पदांच्या भरतीसाठी अंशकालीन कर्मचाऱ्यांना उत्तीर्णतेची गुणमर्यादा 45 टक्क्यावरुन 40 टक्के करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. हा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर हजारो अंशकालीन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतील नियुक्ती परीक्षेमध्ये असलेल्या किमान गुणांची अट शिथील करण्याच्या अनुषंगाने माझ्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार कु. प्रणितीताई शिंदे, सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव श्रीमती गीता कुलकर्णी आदी उपस्थित होते.

  Join Official WhatsApp Channel