चिपळूण तालुक्यातील लघु पाटबंधारे

चिपळूण तालुक्यातील लघु पाटबंधारे
2021-01-07 16:01:18

चिपळूण तालुक्यातील लघु पाटबंधारे योजनेसाठी जलविज्ञान विभागाकडून पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र तसेच संबंधित कामाचे अंदाजपत्रक तयार करून, निधी उपलब्धतेनुसार योजनेच्या कार्यास तातडीने सुरवात करावी. कोसंबी लघु पाटबंधारे योजनेसंदर्भातील भूसंपादनाचा निधी प्राप्त करून त्यासही गती द्यावी असे निर्देश आज संबंधित अधिका-यांना दिले.
आज मंत्रालयात चिपळूण - संगमेश्वर अंतर्गत येणा-या लघु पाटबंधारे योजनेच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संबंधितांना सुचना दिल्या. या बैठकीस आमदार शेखर निकम, उपसचिव दि.म. देवराज, अभिक्षक अभियंता सु.भ. काळे, शे.वि.वडाळकर, सा.भि.भराडे आदी अधिकारी उपस्थित होते.
कोसुंब व फुरूस कदमवाडी, फुरूस चव्हाण वाडी, कोसबी, साठवण तलाव गणेशपुर, ओवळी, कापरे गांग्रई या योजनेच्या भुसंपादनाचा निधी प्राप्त करून, योजना तातडीने पूर्ण करून पाणीसाठा उपलब्ध करून द्यावा. याचबरोबर तळसर, मुंढे तर्फे सावर्डे या योजनांचे अंदाजपत्रक तयार करावेत. महामंडळाअंतर्गत चिपळूण तालुक्यातील भोवडे बाईंगवाडी, वांझोळे, गोळवली, कळंबुशी या लघु पाटबंधारे योजनांचे अंदाजपत्रक तयार करून तातडीने कामे पुर्णत्वास न्यावी असे यावेळी सांगितले.